Sunday, August 17, 2025 05:22:40 PM

IPL 2025 RR Vs KKR: गुवाहाटीच्या पिचवर कोण मारणार बाजी? राजस्थान की कोलकाता?

IPL 2025 : गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होणार आहे.

ipl 2025 rr vs kkr गुवाहाटीच्या पिचवर कोण मारणार बाजी राजस्थान की कोलकाता
IPL 2025 RR Vs KKR: गुवाहाटीच्या पिचवर कोण मारणार बाजी? राजस्थान की कोलकाता?

गुवाहाटी : IPL 2025 मध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होणार आहे. उभय संघातील हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघानं आपला पहिला सामना गमावला होता. त्यामुळं विजयी ट्रॅकवर येण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील. राजस्थानला सनरायझर्स हैदराबादने ४४ धावांनी पराभूत केलं होतं, तर कोलकात्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ विकेट्सने धूळ चारली होती. त्यामुळं दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

बरसापारा क्रिकेट स्टेडियमची खेळफट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. या खेळीपट्टीर वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही तर फिरकीपटू काही प्रमाणात प्रभावी ठरू शकतात. दुसऱ्या डावात दव फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. यामुळं फलंदाजी करणं तुलनेत सोपी होते. या मैदानावर आतापर्यत ४ सामने खेळवण्यात आले आहे. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २ वेळा विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. तर राहिलेल्या एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही. या मैदानावर सर्वोच्चा धावसंख्या ही १९९ ही असून २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाविरोधात दिल्ली कॅपिटल्सने ही धावसंख्या केली होती. आज गुवाहाटीतील हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तर पावसाचा फक्त २ टक्के अंदाज असल्यामुळं सामना व्यवस्थित पूर्ण होईल अशी आशा आहे.  

केकेआर-राजस्थान हेड-टू-हेड

आयपीएलच्या इतिहासात राजस्थान आणि कोलकाता यांच्यात २९ सामने झाले आहेत. यात राजस्थानने १४ सामन्यात बाजी मारली आहे. तर कोलकात्याने देखील १४ सामने जिंकले आहे. राहिलेला एक सामना अर्णिणीत राहिला आहे. म्हणजेच हेड-टू-हेड आकडेवारी पाहिल्यास दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे दिसून येते. यामुळे आजचा हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.  

गुवाहाटीच्या खेळपट्टीचा विचार केला असता जो संघ नाणेफेक जिंकेल तो संघ संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. राजस्थानकडे मजबूत टॉप ऑर्डर आहे. तर कोलकाताकडे अष्टपैलू खेळाडूंची फौज आहे. हेटमायर आणि जैस्वाल राजस्थानच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तर कोलकातासाठी रसेल आणि नरेन यांचे प्रदर्शन निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा - Indian Cricketer Wife: 'या' आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी

राजस्थानची संभाव्य प्लेइंग ११

यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग (कर्णधार), नितीश राणा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, महेश तिक्षना, तुषार देशपांडे,

संदीप शर्मा

इम्पॅक्ट प्लेयर: फजलहक फारूकी, वानिंदु हसरंगा

हेही वाचा - Yuzvendra Chahal Viral T-Shirt: युझवेंद्रने दिला टी-शर्टद्वारे अनोखा टोमणा

केकेआरची संभाव्य प्लेइंग ११

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमनदीप सिंग, हर्षित राणा, स्पेंसर जॉनसन, वरुण चक्रवर्ती

इम्पॅक्ट प्लेयर: वैभव अरोरा, अनुकूल रॉय


सम्बन्धित सामग्री